-->
अतिवृष्टीतीलपीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमाकंपनीस द्यावी - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

अतिवृष्टीतीलपीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमाकंपनीस द्यावी - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी  अनेक महसुल मंडळात अविवृष्टी झाली. मोठ्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने आणि नदी नाल्याला पूर आल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी स्थानिक आपत्ती अंतरर्गत पीक विमा कंपनीकडे (एचडीएफसी एर्गो) नुकसान भरपाई मिळणेसाठी घटना घडल्यापासुन 72 तासांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान कळविताना सर्व्हे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे आवश्यक आहे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीतील पीक नुकसानी बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ज्या शेतकरी व्यक्तींनी खरिप हंगाम 2021 मध्ये विम्याचे हफ्ते भरले आहेत त्या शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे आवश्यक आहे.

पीक नुसानानीची माहिती कळविण्याची पद्धत

 केंद्र शासनाच्या Crop Insurance ॲपव्दारे Crop Insurance- https#//play.google.com/store/apps/details ? id=in.farmguide.farmerapp.central&hI=en_IN&gl=US (वरील ॲप फोनमध्ये Install करुन आपली माहिती देण्यात येणाऱ्या सुचनांव्दारे योग्य रित्या भरावी.) किंवा HDFC Ergo कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 1800 2660 700  क्रमांकावर फोन करुन कळविता येईल किंवा कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करता येईल-अर्ज सादर करताना खलील माहिती अवश्य भरावी- नाव, मोबाईल क्रमांक, अधिसूचित मंडळ, बँकेचे नाव, आपत्तीच प्रकार, बाधित पीक, विमा भरल्याची  पावती इत्यादी किंवा एचडीएफसी  एग्री वेबसाईटवर वेबलिंकव्दारे स्थानिक आपत्ती ची माहिती दयावी. Link-https://customersupport.hdfcergo.com/selfhelp/RABG_Claim.aspx अधिक माहितीसाठी

Email: pmfby.maharashtra@hdfcergo.com

पीक नुसानानीचा पंचनामा करणारी समिती
विमा कंपनी (HDFC Ergo) प्रतिनिधी,
स्थानिक कृषी सहाय्यक अधिकारी,
स्थानिक तलाठी

0 Response to "अतिवृष्टीतीलपीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमाकंपनीस द्यावी - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe