-->
औरंगाबाद : बुधवार २९ सेप्टेंबर रोजी शहरात २५ ठिकाणी मोफत होणार मधुमेह (डायबेटीस) टेस्ट-वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद : बुधवार २९ सेप्टेंबर रोजी शहरात २५ ठिकाणी मोफत होणार मधुमेह (डायबेटीस) टेस्ट-वाचा सविस्तर माहिती


-बुधवारी (दि.२९ रोजी) शहरात २५ ठिकाणी मोफत होणार मधुमेह चाचणी
-एका दिवसांत दहा लाख मधुमेह चाचणी करण्याचे उद्दिष्ट
-डीफिट डायबेटिस उपक्रमाअंतर्गत मधुमेह तज्ज्ञांच्या संघटनेचा प्रयत्न

औरंगाबाद, दि. २७ : डीफिट डायबेटिस उपक्रमांतर्गत बुधवार, २९ सप्टेंबर रोजी १० लाख रुग्णांच्या रक्तातील -साखरेची मोफत तपासणी (फ्री ब्लड शुगर टेस्ट) करण्याचा प्रयत्न भारतीय मधुमेह संघटनेकडून केला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद शहरात २५ ठिकाणी मोफत रक्तातील साखरेची चाचणी करण्यात येणार आहे. भारतातील मधुमेह तज्ञांच्या संघटनेकडून १ जुलैपासून शंभर दिवस 'डीफिट डायबेटिस' हा उपक्रम संपूर्ण देशात राबवण्यात येत असून त्यातून आत्तापर्यंत सुमारे १२ कोटी लोकांना नियमितपणे रक्तातील साखरेची तपासणी करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे . ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी त्यावर लक्ष ठेवून नियंत्रणातही ठेवण्याचा संदेश संपूर्ण देशभर दिला जाणार आहे. यासाठी उद्या बुधवारी २९ सप्टेंबरला देशात दहा लाख शुगर तपासण्याचे उद्दिष्ट संघटनेने ठेवले आहे. या तपासणीचे रेकॉर्ड हे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यासाठी कार्य येणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रमुख गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे उपक्रमाअंतर्गत औरंगाबाद शहरातील सर्वच भागात २५ ठिकाणी मोफत रक्तातील शुगर तपासणी होईल. यासाठी कोविडचे नियम पाळणे बंधनकारक आहे. एका वेळी मर्यादित व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. लसीकरण झालेल्या व पूर्व नोंदणी केलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन 'डीफिट डायबेटिस', 'आरएसएसडीआय' च्या डॉ. मयुरा काळे, औरंगाबाद 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, डॉ. यशवंत गाडे, रोटरी क्लबच्या ज्योती काथार, डॉ. अनिता देशपांडे, डॉ. राजीव मुंदडा, चंद्रकांत चौधरी, राहुल बोधनकर ,डॉ. अभिमन्यू माकणे यांनी केले आहे. खलील ठिकाणी मोफत रक्तातील -साखरेची मोफत तपासणी (फ्री ब्लड शुगर टेस्ट) केली जाणार आहे.


1.डॉ. मयुरा काळे,गोकुळ स्वीट कॉर्नेर , एन 4 सिड्को, संपर्क : 02402451698

2.ईश्वर हॉस्पिटल,पडेगाव, संपर्क : 8999311512

3.डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य ,मेडिसिन ओपीडी ,शा वै म रुग्णालय (स १०- दु 1)

4.डॉ. मयुर भोसले ,डिटेक्ट लॅब ,रिलायंस मॉल (स १०- दु 2)

5.चंद्रकांत चौधरी, भेंडळा ग्राम पंचायत, संपर्क : 9404848342 (स १०- दु 2)

6.ज्योती काथार, रोटरी क्लब,मिड टाउन संपर्क : 9689373637

7.राहुल बोधनकर रोटरी क्लब औरंगबाद सेंट्रल सम्पर्क 9422209890

8.डॉ.अहेसान शेख , शहागंज

9.डॉ.रंजना देशमुख , डॉ हेडगेवार हॉस्पिटल (स १०- दु 2)

10.डॉ.संजय देवरे, सम्पर्क 9822375809

मेडीचेक पॅथॉलॉजि लॅबोरेटरी, बंजारा कॉलनी चौक, शिवाजी हायस्कूल रोड

11.डॉ.प्रमोद सरवदे ,जुबेली पार्क

12.डॉ.दीपक केंद्रे ,एन 2 सिड्को ,02402489000

13.डॉ.सुवर्णा निकम, ग्रामिण रुग्णालय ,करमाड

14.डॉ.प्रशांत चौधरी, म्रुत्युंजय क्लिनिक सिड्को

15.डॉ. विशाल ठाकरे, साई मेडिसिटी हॉस्पिटल आणि आय सी यु एन ११ जळगाव रॉड औरंगाबाद, संपर्क : 9823444526 सकाळी ६:३० ते दु १:००

16.डॉ. पी. एस. पाटणी, त्यागी भवन, नेर जैन मंदिर,अरिहांतनगर, औरंगाबाद

17.डॉ.जबीन पटेल, पडेगाव

18.डॉ.ठोळे संमती ,हडको एन 9 डॉ. ठोळे संमती,राजा बाजार

19.डॉ.अनंत कडेठाणकर ,उल्कनगरी

20.डॉ. श्रद्धा परळीकर, एन- ५ ,सिडको

21.डॉ. गीतेश दळवी, चैतन्य नगर,गारखेडा

22.डॉ. ज्ञानेश्वर गजभारे, सिंधी कॉलनी,

23.डॉ.निलेश लोमटे, दुध डेअरी सिग्नल

24.डॉ.अर्चना सारडा, स्टेपिंग स्टोन हायस्कूल

25.डॉ. नितिन संचेती ,जवाहर कॉलनी

0 Response to "औरंगाबाद : बुधवार २९ सेप्टेंबर रोजी शहरात २५ ठिकाणी मोफत होणार मधुमेह (डायबेटीस) टेस्ट-वाचा सविस्तर माहिती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article