-->
ब्रेकिंग बातमी: मुंबई साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार, निर्भया कांडची पुनरावृत्ति

ब्रेकिंग बातमी: मुंबई साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार, निर्भया कांडची पुनरावृत्ति

Mumbai : मुंबईच्या साकीनाका (Sakinaka)परिसरात एक 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेमुळे मुंबई सह पूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहरात महिलेवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर इतर शहरांमधील परिस्थितीत काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. 

पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहे. पोलिसांना संबंधित परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीचे दुष्कृत्य कैद झालं आहे. रात्रीच्या अंधारामुळे सीसीटीव्हीत फारसं स्पष्ट दिसत नाहीय. पण परिसरात संशयास्पद घटना घडतेय, ते स्पष्टपणे जाणवत आहे.

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय ?

साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक कृत्य केलं. एका टेम्पोत हा सगळा प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. संबंधित घटना ही गुरुवारी मध्यरात्री 9 ऑगस्ट तीन वाजेच्या सुमारास घडली.

पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

0 Response to "ब्रेकिंग बातमी: मुंबई साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार, निर्भया कांडची पुनरावृत्ति"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe