
मुख्यमंत्रीवर खालच्या पातळीवर टिका, नारायण राणे होणार अटक, चिपळुनमध्ये हाय-होलटेच ड्रामा होण्याची शक्यता
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टिका केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी पत्रकार परिषद घेत टिका केली आहे. त्यानंतर राज्यभरात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक पातळीवर नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यातही शिवसेना आमदार अंबादास दानवे, नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राज्यातील आणखी काही शहरांमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन शिवसैनिकांकडून त्यांची चांगलीच कोंडी केली जाऊ शकते.
नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मुख्यत्वेकरुन मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रुभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम 153, 189, 504, 505 (2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. एवढेच नव्हे तर नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे.
0 Response to "मुख्यमंत्रीवर खालच्या पातळीवर टिका, नारायण राणे होणार अटक, चिपळुनमध्ये हाय-होलटेच ड्रामा होण्याची शक्यता"
टिप्पणी पोस्ट करा