
औरंगाबाद : मध्यरात्री प्रवाश्याने रिक्षावाल्याला चाकु खुपसले, उपचार दरम्यान रिक्शा चालकाचा मृत्यु
औरंगाबाद : मध्यरात्री ही घटना आझाद चौक येथे घडलेली आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका व्यक्तीने रिक्षा वाल्याला बायजीपुरा सोडण्याची मांगणी केली. परंतु सदरील रिक्षावाल्याला घरी जायला उशिल होत होता म्हणुन त्याने त्या प्रवाश्याला नकार दिला. म्हणुन प्रवाश्याने खिश्यातील चाकु बाहेर काढुन त्या रिक्षा चालकाला खुपसला. त्यानंतर रिक्षा ड्रायव्हरला घाटी रुग्णालय येथे नेण्यात आले परंतु तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती आहे. जिन्सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला अटक करण्यात आले.
नारेगांव येथील रिक्षा चालक शेख अयाज शेख अहेमद वय २५ वर्ष, असे मयताचे नांव आहे. तसेच फरहान फारुख शेख, वय ३० वर्ष (बायजीपुरा) असे आरोपीचे नांव आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले असुन सदरील आरोपीला २२ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे.
0 Response to " औरंगाबाद : मध्यरात्री प्रवाश्याने रिक्षावाल्याला चाकु खुपसले, उपचार दरम्यान रिक्शा चालकाचा मृत्यु "
टिप्पणी पोस्ट करा