-->
मोठी बातमी : नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मोठी बातमी : नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या कारणाने त्यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा  मंत्री नारायण राणे हे जनआर्शिवाद यात्रा करत होते. राणे समर्थन यावरुन नाराज आहे. रत्नागिरी न्यायालयाने राणे यांची अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर भाष्य केल्याने नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या वेगवेगळे ठिकाणाहुन शिवसैनिकांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविला आहे याची माहिती दिली होती. मुंबई येथे या प्रकरणावरुन हाय-व्होलटेज ड्रामा होतांना दिसला. राणे समर्थक आणि युवाशिवसैनिक हे समोरा-समोर आले होते.

त्यानंतर माजी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, आम्ही राणेंच्या त्या विधानाचा समर्थन करत नाही परंतु भाजपा राणेंच्या पाठीमागे उभी आहे. पोलिसांचा गैरवापर झाल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत देवेंद्र फडवणीस यांनी केला.

0 Response to "मोठी बातमी : नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article