-->
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, पी.एच.डी.पेटची मुदतवाढ देऊन EWS आरक्षणाचा लाभ द्या -राजेंद्र दाते पाटील

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, पी.एच.डी.पेटची मुदतवाढ देऊन EWS आरक्षणाचा लाभ द्या -राजेंद्र दाते पाटील

 


मुबई  (प्रतिनिधी) - राज्य भरातील विविध विद्यापीठांमध्ये २०२०-२१ मध्ये संशोधन कार्य म्हणजे पी.एच.डी. करणार्‍या पेट परिक्षा-१ आणि पेट परिक्षा-२ विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएस १०% आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, आणि याची पूर्तता होई पर्यंत आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असता त्यांनी सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे निवेदन आपल्या योग्य आशा निर्देशासह उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचीव ओमप्रकाश गुप्ता यांचे कडे पाठवले असल्याची माहीती त्यांना मेल द्वारे उलट टपाली कळवण्यात आले आहे.

आभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचे मागणी नुसार या पूर्वी सुद्धा पी.एच.डी.पेट परीक्षा १ व २ विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती परंतु सबांधित विद्यापीठांना सदर हजारो विद्यार्थी वर्गाला इडब्लूएस लाभ देण्यासाठी काही एक सूचना न देताच फक्त कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ १४ जुलै २०२१ पर्यंत दिली होती जी की, विद्यार्थी वर्गाला उपयोगी ठरली नाही म्हणून मुदत संपण्या पूर्वीच १३ जुलै२०२१रोजी जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नव्याने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले असता वरील प्रमाणे प्रधान सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत.दिलेल्या निवेदना मध्ये त्यांनी असे नमुद केले की, महाराष्ट्र राज्यामध्ये खुल्या प्रवर्गासह एस.इ.बी.सी. प्रवर्गातील हजारो विद्यार्थी यांनी आपले अर्ज एक तर एस.इ.बी.सी. मध्ये किंवा खुल्या वर्गातून अर्ज सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे मराठा प्रवर्गातील सर्व विद्यार्थी यांना इ.डब्ल्यू.एस. १०% आरक्षण देण्या बाबतची तरतुद राज्य शासनाने केलेली असून सुद्धा राज्यातील विविध संस्था आणि विद्यापीठांनी पी.एच.डी. विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी इ.डब्लू.एस हा प्रवर्गच ठेवला नव्हता. त्यात प्रामुख्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश असून प्रशासनाच्या या चुकांमुळे हजारो विद्यार्थी संशोधन कार्यापासून वंचित राहणार असल्या मुळे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या निदर्शनास सदर बाब अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लक्षात आणून दिल्यामुळे त्यांनी तात्काळ ही बाब मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे कळवून त्यात नमुद केले की, सदरच्या पी.एच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी ए.सी.बी.सी. हा प्रवर्गच ठेवला नव्हता किंवा इ.डब्ल्यू.एस. प्रवर्ग नमुद केला नव्हता. त्यामुळे या हजारो विद्यार्थ्यांना इ.डब्ल्यू.एस. १०% आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यामुळे किंवा लाभ द्यावा असे कुठलेही निर्देश विविध विद्यापीठांना नसल्यामुळे आणि नेमकी हीच बाब विद्यापिठांनी निर्गमीत केलेल्या जाहिराती मध्ये निर्देशित केलेली नसल्यामुळे हजारो विद्यार्थी पात्र असतांना सुद्धा अपात्र ठरविल्यामुळे विद्यार्थ्यांचे कायमस्वरुपी नुकसान होणार असल्याची बाब जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आपल्या सविस्तर दुसऱ्या निवेदनात नमुद करुन पुढे त्यांनी असेही लक्षात आणुन दिले की,  प्रमाणे पेट परिक्षा-१ व पेट परिक्षा-२ या सर्व विद्यार्थ्यांना इ.डब्ल्यू.एस. प्रवर्गातून प्रवेश देण्याचा सुधारीत आदेश तात्काळ संबंधित विद्यापीठांना आणि सर्व शैक्षणिक संस्थांना जारी करण्यात याव्यात. त्याच प्रमाणे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यां प्रमाणे ६००/- रु. मंजूर करुन या प्रवेशासाठी पेटच्या परिक्षा क्र.१ आणि २ पेपर मध्ये पात्रता खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी सरासरी ५०% पात्र होण्यासाठी आहे तर इ.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पात्र होण्यासाठी ४५% होणार आहे. म्हणून सदरच्या सर्व विद्यार्थ्यांना इ.डब्ल्यू.एस. १०% आरक्षणा बाबत लाभ देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले असून औरंगाबाद खंडपीठा मध्ये नुकतीच एक याचिका इ.डब्ल्यू.एस. आरक्षण देणारा शासनाचा तो जी.आर. रद्द करावा, अशी याचिका दाखल झाली होती. त्यामध्ये सुद्धा जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी कॅव्हेट पिटीशन  दाखल केली होती. परंतु याचिका कर्त्यांनी सदरची याचिकाच न्यायालयाने विचारल्यावरुन वापस घेतली होती. आता न्यायालयाची सुद्धा काही एक अडचण नसल्यामुळे आता या सर्व विद्यार्थ्यांना इ.डब्ल्यू.एस. १०% आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. तसेच सदर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आप-आपल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी ३० जून २०२१ ही शेवटची तारीख होती ती १४ जुलै २०२१ पर्यंत वाढविली होती परंतु इ डब्लू एस लाभ दिलेला नव्हता किंवा विद्यापीठ प्रशासनास काही एक सूचना दिल्या नाही. कोविड जन्य परिस्थिती आणि विद्यापीठ प्रशासनाचा दुर्लक्ष पणा यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी मुदतवाढ देऊन पात्र ठरणार्‍या सगळ्याच विद्यार्थ्यांना जाहिराती मध्ये इ.डब्ल्यू.एस.चा उल्लेख नसल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना इ.डब्ल्यू.एस. प्रवर्गातून पी.एच.डी. प्रवेश देण्यासाठी पात्र ठरवण्याचे निर्देश दरम्यानच्या कालावधी मध्ये सर्व विद्यापीठांना आणि संस्थांना जनहितार्थ तात्काळ जारी करावे, अशी मागणी सुद्धा आरक्षणचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील मुख्यमंत्र्यांकडे केली असता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उच्च शिक्षण विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडे पुढील तात्काळ कार्यवाही साठी पाठवल्या बाबतचा मेल राजेंद्र दाते पाटील यांना नुकताच प्राप्त झाला असल्यामुळे त्यावर तात्काळ कार्यवाही होऊन हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल, अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

0 Response to "मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, पी.एच.डी.पेटची मुदतवाढ देऊन EWS आरक्षणाचा लाभ द्या -राजेंद्र दाते पाटील"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe