
मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन कापले. मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्द गुन्हा दाखल
रविवार, १८ जुलै, २०२१
Comment
औरंगाबाद : शहरवासीयांना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करा, अन्यथा मनपा आयुक्त तथा प्रशासकांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कापण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने ता.७ जुलैला देण्यात आला होता. त्यानुसार, रविवारी (ता.१८) पहाटे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन कापले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या वतीने मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्द सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कोलमडलेले आहे. शहरवासीयांना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी ता.७ जुलै रोजी मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, उपशहराध्यक्ष राहुल पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत दहीवाडकर आणि वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनीष जोगदंडे यांनी पत्रकार परिषद घेत सिटी वॉटर युटिलिटी कंपनी व महानगर पालिका यांच्यात झालेल्या २०११ च्या करारानुसार पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचे ठरले होते. किमान आता तरी शहरवासियांचे पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे.
0 Response to "मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन कापले. मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्द गुन्हा दाखल "
टिप्पणी पोस्ट करा