-->
शिल्पा शेट्टीचा पति व उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती

शिल्पा शेट्टीचा पति व उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती

पॉर्न फिल्म बनविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिल्पा शेट्टीचा पति राज कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती लागला आहे. या सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोर्नोग्राफिक कंटेंट अपलोड करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. आता आयटी तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस हे सर्व्हर खंगाळून काढून कुंद्रा यांच्या डर्टी पिक्चरचे काळेधंदे उघड करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पोलिसांच्या हाती लागलेल्या या सर्व्हरमधून कुंद्रा यांची पूर्ण पोलखोल होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी त्याचे फोनही जप्त केले आहेत. तसेच हे फोन तपासणीसाठी लैबला सुद्धा पाठवण्यात आले आहेत. राज कुंद्रा याची पोलखोल करण्यासाठी फोन आणि सर्व्हर या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचंही सांगितलं जात आहे.

राज कुन्द्राची व्हॉट्सअ‍ॅप चॅटींग

राज कुंद्राच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार H नावानं त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचा तो अ‍ॅडमिन होता. या ग्रुपमध्ये केवळ चारच लोक शामिल होते. या ग्रुपमध्ये मॉडल्सचे पेमेंट आणि रेव्हेन्यूच्याबाबत चर्चा केली जात होती. या प्रकरणात आता आणखी नवी माहितीही पोलिसांच्या हाती आली आहे.

यातील एक चॅट 10 नोव्हेंबर 2020मधील आहे. यात एका वृत्तपत्राचं कात्रण शेअर करण्यात आलं आहे. पॉर्न कंटेट दाखवणाऱ्या सात ओटीटी प्लॅटफॉर्म्सला समन्स बजावल्याची ही बातमी आहे. या बातमीवर ” Thank God U Planned BF” असं उत्तर देण्यात आलंय. त्यानंतर कुंद्रा यांनी काही दिवसांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून बोल्ड कंटेट हटवण्याच्या सूचनाही सहकाऱ्यांना दिल्या. 

नेमकं काय आहे प्रकरण? सविस्तर वाचा 

उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या हा प्रकरण चांगलाच पेटला आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले. माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे.

राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप केले आहे.

0 Response to "शिल्पा शेट्टीचा पति व उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कुंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर पोलिसांच्या हाती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe