-->
 त्या वायरल क्लिप वरुन खासदार जलील यांचा विरोधकांना टोला, सर्व नियम फक्त माझ्यासाठीच का ?

त्या वायरल क्लिप वरुन खासदार जलील यांचा विरोधकांना टोला, सर्व नियम फक्त माझ्यासाठीच का ?

औरंगाबाद : खासदार इम्तियाज़ जलील यांची नुकतीच एक क्लिप वायरल झाली होती, व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ्यांच्या कार्यकर्त्‍यांकडून पैशाचा वर्षाव होत असल्याचं दिसून येत होते. या क्लिप वरून विरोधकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की सर्व नियम खासदार यांच्यावरच का लागू करण्याचे बोलले जाते ? 

या अगोदर या शहरांमध्ये शिवसेना तर्फे एक मोठे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुद्धा एक कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्येही कोरोनाचे नियम मोडल्याचे दिसून आले होते. 

या सर्व गोष्टी पाहताना सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही, तर फक्त नियम खासदारांवरच का ? असे विचारून इम्तियाज जलील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तरी त्यांनी सांगितले की जर प्रशासन सत्तेत असेल अशा राजनैतिक पार्टीन वर कारवाई करत नसेल तर कारवाईसाठी मी तयार आहे

0 Response to " त्या वायरल क्लिप वरुन खासदार जलील यांचा विरोधकांना टोला, सर्व नियम फक्त माझ्यासाठीच का ? "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe