-->
हा सोपा घरघुती उपाय करा आणि डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे (डार्क सर्कल) कायमचे संपवा

हा सोपा घरघुती उपाय करा आणि डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे (डार्क सर्कल) कायमचे संपवा

अनेक जणांना ही समस्या आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची अनेक कारणे आहेत. पुरेशी झोप न घेणे, योग्य आहाराचा अभाव आणि शरीरात पोषक तत्वांचा अभाव यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. जर आपण योग्य आहार घेतला आणि पुरेशी काळजी घेतल्यास डार्क सर्कलची समस्या दूर होऊ शकते किंवा कायमचे डार्क सर्कल आपण हटवू शकतात.आज आपण या लेखामध्ये डार्क सर्कल घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेणार आहोत.

डोळ्याखाली असणारे डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. रात्री झोपायच्या आधी कापसावर गुलाब पाणी घ्या आणि हलक्या हाताने ते आपल्या डोळ्याच्या खाली असणाऱ्या डार्क सर्कलवर लावा. गुलाब जल मध्ये असणार्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात. आणि आपल्या उपाय आपल्याला साधारणपणे 3 ते 4 आठवडे करायचा आहे.

बदामाचे तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. डोळ्याखाली असणारे डार्क सर्कल घालवण्यासाठी सुद्धा
आपण त्याचा वापर करू शकतो. रात्री झोपायच्या आधी कापसावर थोडेसे बदाम तेल घेऊन हलक्या हाताने ते आपल्या डोळ्याच्या खाली असणार्या डार्क सर्कलवर लावा. आणि हलके हातांनी मालिश करा काही दिवसातच आपल्या डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे नाहीशी होतील.

डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ नये यासाठी आपण रोज
नियमित सहा ते आठ तास झोप घ्या आपल्या आहारात
ताजी फळे , हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असुद्या. दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्या. आपल्या रक्तात हिमग्लोबीन करमी झाल्यावर सुद्धा आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. त्यामुळे आपल्या आहारात बीट, डाळिंब, पालक, टॉमेटो यांचा समावेश असुद्या.

आपल्याला हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक
करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या
मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे क्मेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी
प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल
कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती
स्वतःच्या जोखमीवर करावी. 

0 Response to "हा सोपा घरघुती उपाय करा आणि डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे (डार्क सर्कल) कायमचे संपवा "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe