-->
प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत  जुलै ते नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्‍य वाटप

प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत जुलै ते नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्‍य वाटप

औरंगाबाद : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकट अजूनही कायम आहे. त्‍यामुळे गरिबांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. त्‍यांना आधार देण्‍यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत जुलै ते नोव्‍हेंबर या पाच महिन्‍यांसाठी राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजनेंतर्गत सात कोटी लाभार्थ्‍यांसाठी प्रतिमाह साडेतीन लाख मेट्रिक टन धान्‍य उपलब्‍ध झाले आहे. सर्व जिल्ह्यातील पुरवठा विभागाला धान्‍याची उचल करुन वाटप करण्‍याचे आदेश अन्‍न नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत प्रत्‍येक लाभार्थ्‍यांना पाच किलो धान्‍य मोफत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी कळविले आहे. औरंगाबाद  जिल्ह्यातील लाभार्थी आणि प्रतिमाह मिळणारे मोफत अन्‍नधान्‍य (आकडे मे. टन मध्‍ये )

अंत्‍योदय योजना

प्राधान्‍य कुटूंब योजना

लाभार्थी संख्‍या

गहू

तांदूळ

लाभार्थी संख्‍या

गहू

तांदूळ

३२१८२१

९६५

६४४

२००८५३०

६०२६

४०१७

  कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे केंद्र शासनाने २४ जून २०२१ च्‍या आदेशान्‍वये सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत लाभार्थ्‍यांसाठी आणखी पाच महिने म्‍हणजे दिवाळीपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत  गरिबांसाठी मोफत धान्‍य देण्‍याचा आदेश दिला आहे. जुलै ते नोव्‍हेंबर या कालावधीत लाभार्थ्‍यांना दिल्‍या जाणा-या नियमित धान्‍याव्‍यतिरिक्‍त हे धान्‍य वाटप केले जाणार आहे.

    त्‍यानुसार प्राधान्‍य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह पाच किलो धान्‍य मोफत दिले जाणार आहे. सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी रास्‍त भाव दुकानातून नियमित अन्‍नधान्‍या व्‍यतिरिक्‍त हे प्रतिसदस्‍य मोफत अन्‍नधान्‍य उपलब्‍ध  होणार आहे. “एक देश एक रेशन कार्ड” योजनेंतर्गत कोणत्‍याही लाभार्थ्‍यांला कोणत्‍याही राज्‍यातील अथवा जिल्‍हयातील रास्‍तभाव  दुकानातून धान्‍याची उचल करता येणार आहे त्‍यामुळे  सर्व लाभार्थी यांनी मोफत प्राप्‍त  धान्‍याचा लाभ घ्‍यावा असे आवाहन  जिल्‍हाधिकारी श्री. चव्‍हाण तसेच जिल्‍हा पुरवठा अधिकारी श्रीमती. भोसले यांनी केले

0 Response to "प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत जुलै ते नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्‍य वाटप"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe