-->
गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी खासदार इम्तिया़ज जलील यांनी सुरु केले मिशन तहसील

गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी खासदार इम्तिया़ज जलील यांनी सुरु केले मिशन तहसील

 

काही अधिकारी, कर्मचारी व एजंटांनी तहसील कार्यालयाला बनविला आर्थिक शोषणाचा अड्डा – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, निराधार, वृध्द व इतर सर्वसामान्य नागरीकांची कामे तालुक्यातील तहसील कार्यालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असुन त्यांच्यावर संबंधित अधिकारी व कर्मचारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याचे अनेक तक्रारी नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे करुन तहसील कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी कशा प्रकारे मानसिक त्रास देवुन आर्थिक शोषण करत असल्याचे निदर्शनास आणुन दिले. कामचुकारपणा व भ्रष्टाचारास खतपाणी घालणाऱ्या काही अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे तहसील कार्यालयाची प्रतिमा सर्वसामान्य जनतेसमोर मलीन होत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी नागरीकांचे प्रलंबित प्रश्न, कामे, समस्या, तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्यांच्या स्वत:च्या मार्गदर्शन व देखरेखीखाली औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात मिशन तहसील या कार्यक्रमाची सुरुवात केली.

          तहसील कार्यालयात नेहमी नागरीकांची वर्दळ कायम असते, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आपआपसात समन्वय नसल्याने अनेक तक्रारी व कामे प्रलंबितच राहतात. तहसील कार्यालयात समस्या अथवा तक्रार घेवुन गेलेल्या नागरीकांचे वेळेवर काम होत नसुन अधिकारी व कर्मचारी एक दुसऱ्याकडे बोट दाखवत असल्याने नागरीकांना मनस्ताप होत आहे, जर कोणी धाडस करुन या सावळ्या गोंधळाची तक्रार वरिष्ठांकडे केल्यास त्याचे कामच होत नाही. उलट त्याची फाईलच गायब केली जात असल्याचे अनेक धक्कादायक प्रकरणे समोर असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

         तहसील कार्यालयात शेत रस्ते, शेतकऱ्यांचे फेररफार संबंधी प्रकरणे, महसूल वसुली, दंड, गौण खनिजसंबंधी तक्रारी, वृक्षतोड, रोजगार हमी योजना, पीक कर्ज, पैसेवारी, कृषीविषयक कामे, पाणी व चारा टंचाई, गायरान जमीन, अतिक्रमण, दफन व स्मशान भुमीस जमीन, संजय गांधी, श्रावण बाळ, वृध्दपकाळ, राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजना, शेतकरी आत्महत्या अर्थ सहाय्य योजना प्रकरणे, राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, ओला, दुष्काळ, शेतजमीनी प्रकरणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व शिधापत्रिका, रेशन बाबतची महत्वाची कामे याव्यतिरिक्त रहिवासी, उत्पन्न, जात, भूमिहिन, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र यासह इतर महत्वाचे विविध प्रकारचे दाखले तसेच आवश्यक कागदपत्रे घेण्यास येणाऱ्या तरुणांपासून ते वयोवृध्द लोकांना पैसे उकळण्याच्या हेतुने अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढतच आहे. सामान्य नागरीक तहसील कार्यालयात गेल्यावर त्यांचे काम एजंटामार्फतच करण्याची प्रथा असुन वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तक्रारदारास हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांच्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केली असुन या बाबी निदर्शास आणुन दिला आहेत.

          नागरीकांची तहसील कार्यालयात काम होत नसुन फक्त हेलपाटे मारावे लागत असल्याने आणि वरिष्ठ अधिकारी सुध्दा दुर्लक्ष करत असल्याने नाईलाजास्तव अनेक वेळा थेट टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचे प्रयत्न सुध्दा यापुर्वी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केलेले आहे. अनेक प्रकरणात वरिष्ठांचे निर्देश तसेच मा.न्यायालयांचे आदेश असतांना सुध्दा मानसिक त्रास देवुन आर्थिक शोषण करण्याच्या उद्देशाने काही अधिकारी व कर्मचारी कामे करत नसल्याचे निदर्शनास आणुन दिल्याचे खासदार इम्तियाज यांनी सांगितल

तक्रारदारांची अडवणुक करणे, प्रशासकीय नियम व मार्गदर्शक तत्वांचा भंग करणे, गैरवर्तवणुक करणे, अधिकारांचा गैरवापर करणे, शासकीय कामात दिरंगाई करुन कर्तव्यात कसुर करणे यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील तरतुदींचा भंग होत असुन राजशिष्टाचार पाळला जात नसल्याची खेदजनक बाब असल्याची भावना व्यक्त करत, नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने सोडवा, प्रलंबित कामे पूर्ण करा तसेच सर्व लोकप्रतिनिधींशी सौजन्यपुर्वक वागण्याचे निर्देश खासदार इम्तियाज जलील यांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले.

मिशन तहसील कार्यक्रमाचा पहिला टप्पा दिनांक २० जुलै पासुन सुरु होत असुन पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात नागरीकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न, समस्या, तक्रारी, कामे, अर्ज व निवेदनांंचा यशस्वीरित्या पाठपुरावा करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरीकांनी तहसील कार्यालयात जमा केलेल्या तक्रारीची छायांकित प्रतीसह लेखी अर्ज मिशन तहसील अंतर्गत औरंगाबाद शहरातील वार्डनिहाय कमिटी व जिल्हास्तरावर तालुकानिहाय कमिटीकडे स्पुर्द करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

0 Response to "गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी खासदार इम्तिया़ज जलील यांनी सुरु केले मिशन तहसील"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe