-->
कालबध्दरित्या, वेगात क्रीडा संकुल उभारा- पालकमंत्री सुभाष देसाई, चिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन

कालबध्दरित्या, वेगात क्रीडा संकुल उभारा- पालकमंत्री सुभाष देसाई, चिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन

चिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन




औरंगाबाद, दि.27, :- मराठवाड्याच्या राजधानीत क्रीडा संकुल साकारण्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे. या संकुलातून उच्च दर्जाचे गुणवंत खेळाडू निर्माण होतीलच. त्यासाठी प्रशासनाने कालबध्दरित्या, वेगाने क्रीडा संकुलाची निर्मिती करावी, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केल्या. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या चिकलठाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, सर्वश्री आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची उपस्थिती होती.
मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासनाने संकुल निर्मितीसाठी येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या दूर केल्या आणि संकुलासाठी 37 एकर जागा क्रीडा विभागास उपलब्ध करुन दिली. याबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक आहे. शासन क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर अधिक भर देत आहे. या क्रीडा संकुल निर्मितीसाठी भरीव प्रमाणात निधी देखील देण्यात येईल. या संकुलातून उत्तम कामगिरी करणारे खेळाडू तयार होतील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर संकुलात खेळाडूंसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. अधिकाधिक क्रीडा स्पर्धा होतील यासाठी प्रयत्न करावेत. संकुलातील प्रत्येक इमारतीवर मराठी लिपीत नावे लिहिण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.
बागडे म्हणाले, पूर्वीच्या गायरानावर सध्याचे क्रीडा संकुल उभारत आहे, याचा आनंद आहेच. मात्र, या संकुलाच्या जागेत पाझर तलाव आहे. तो तसाच ठेऊन त्याचा सुनियोजितरित्या उपयोग करावा. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयापासून संकुलापर्यंत रस्ता करावा, अशा सूचना केल्या.

 

फुलंब्रीतील क्रीडा संकुलास निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही केली.क्रीडा संकुलाचे भूमीपूजन विधीवत पद्धतीने देसाई यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चव्हाण यांनी केले. यामध्ये त्यांनी संकुल निर्मिती आणि संकुलातील नियोजीत सुविधेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमृत बिल्हारे, कोमल औताडे यांनी केले. आभार श्रीमती नावंदे यांनी मानले. कार्यक्रमात पीपीटीद्वारे नियोजित क्रीडा संकुलाबाबत माहिती देण्यात आली.

नियोजित क्रीडा संकुलातील सुविधा

संरक्षक भिंत, विविध खेळाची मैदाने, स्केटिंग, बास्केटबॉल, मल्टीपर्पज हॉल, जिम्नॅशिअम, योगा, जिम, टेबल टेनिस, बॉक्सिंग, शूटिंग रेंज, धनुर्विद्या, भारत्तोलन, कुस्ती, बॅडमिंटन हॉल, पाण्याची अंतर्गत सुविधा व टाकी, सिंथेटिक कोर्ट, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, ड्रेनेज व वॉकिंग पाथवे, अंतर्गत रस्ते, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युतीकरण, शेडसह पार्किंग सुविधा, मुलांमुलींसाठी वस्तीगृह आदी.

0 Response to "कालबध्दरित्या, वेगात क्रीडा संकुल उभारा- पालकमंत्री सुभाष देसाई, चिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe