-->
जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांची धड़क करवाई, 24 दुकान केले सील

जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांची धड़क करवाई, 24 दुकान केले सील

औरंगाबाद : कोरोना  विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्या करीता राज्य शासनाने Break The Chain अंतर्गत अनेक नियम घालुन दिले आहेत. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने व आस्थापना ह्या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्याने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता  यांनी आज सकाळी 9.00 वाजता उपजिल्हाधिकारी, कामगार उप आयुक्त महानगरपालीका व महसुल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली विशेष भरारी पथके तयार करुन दुकाने व आस्थापना ( अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून) चालू राहणार नाही याची खबरदारी घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठीच्या सुचना दिल्या.

या बैठकीनंतर स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रोड अशा अनेक ठिकाणी पाहणी दौरा करुन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर आणि आस्थापनांवर कारवाई केली. 

विशेष भरारी पथकात कामगार उप आयुक्त, औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी, महसुल विभागातील अधिकारी, महानगर पालीकेतील कर्मचारी व पोलीस खात्यातील त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.

सदर पथकाने सकाळी 9.30 ते 1.00 वाजेपर्यंत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात गस्त घालुन पुढील 24 आस्थापना सिल केल्या. 


1 राज क्लॉथ् स्टोअर्स

जालना रोड, औरंगाबाद

2 गजानन गिफ्ट ॲन्ड टॉईज जालना रोड, औरंगाबाद

3 शिवानी ज्वेलर्स जालना रोड, औरंगाबाद

4 हार्डवेअर कलेक्शन जालना रोड, औरंगाबाद

5 हिल्स लाईट ॲन्ड इलेक्ट्रीकल्स सेव्हन हिल, जालना रोड, औरंगाबाद

6 जीवन तायडे फोटो लॅब निराला बाजार सिटी बँके,समोर, औरंगाबाद

7 सुनील पांडे फोटो लॅब निराला बाजार सिटी बँके,समोर, औरंगाबाद

8 सुभाष जैन फोटो लॅब निराला बाजार, सिटी बँकेसमोर,औरंगाबाद

9 प्रॉमीस स्टेशनरी निराला बाजार पैठण गेट रोड,औरंगाबाद

10 कसबेकर झेरॉक्स ॲन्ड स्टेशनरी नागेश्वरवाडी,औरंगाबाद

11 गणेश दुध् डेअरी, नागेश्वरवाडी, औरंगाबाद

12 रत्नागिरी मँगो हाऊस नागेश्वरवाडी, औरंगाबाद

13 कृष्णाई केक ॲन्ड डेली निडस नागेश्वरवाडी, औरंगाबाद

14 अशोका इंटरप्रायजेस मल्टी सर्व्हिसेस मुकुंदवाडी रोड, औरंगाबाद

15 बालाजी इलेक्ट्रीकल्स मुकुंदवाडी रोड,औरंगाबाद

16 सार्थक भुजंगराव वाघ शेगाव कचोरी सेंटर जैस्वाल हॉल समोर, टी व्ही सेंटर, औरंगाबाद

17 प्रमोद कांतीलाल जैन महाविर मार्टस

( किराणा शॉप) जैस्वाल हॉल समोर, टी व्ही सेंटर, औरंगाबाद

18 संतोष नामदेव म्हस्के सहारा मल्टी सर्वीसेस जैस्वाल हॉल समोर, टी व्ही सेंटर, औरंगाबाद

19 नृसिंह युनिफॉर्म शुटींग शर्टींग सेंटर महाराणा प्रताप चौक, बजाजनगर, औरंगाबाद

20 ओम कलेक्शन मोहटा देवी चौक, बजाजनगर,औरंगाबाद

21 तिरुमला साडी सेंटर मोहटा देवी चौक, बजाजनगर,औरंगाबाद

22 महावीर ज्वेलर्स मोहटा देवी चौक, बजाजनगर,औरंगाबाद

23 आनंद इलेक्ट्रीकल्स धमन कॉम्प्लेक्स, महावीर चौक, वाळूज, औरंगाबाद

24 चिंतामणी ॲल्युमिनीअम ॲन्ड ग्लास धमन कॉम्प्लेक्स, महावीर चौक,वाळूज, औरंगाबाद

25 जुवेरिया क्रॉकरी कलेक्शन किराडपुरा, औरंगाबाद

26 रमजान भाई प्लॉटींग ऑफीस किराडपुरा, औरंगाबाद

अन्न व औषधी प्रशासनाने संस्कृती फास्ट फुड सेंटर,  कॅनॉट प्लेस, सिडको,औरंगाबाद आणि हर्ष मेडिकल एमजीएम गेट समोर, सिडको,औरंगाबाद या  आस्थापनेस कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपेपर्यंत अन्न पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे.

राज्य शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी दिलेल्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी 16 आस्थापना मालकाकडुन रु. 1,25,000/- इतका दंड वसुल करण्यात आलेला आहे

0 Response to "जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांची धड़क करवाई, 24 दुकान केले सील"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe